सातारा-सज्जनगड मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य

सातारा  – सातारानजिक सज्जनगड मार्गावर रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचऱ्यासह इतर कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. यामुळे पर्यटक व भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्याने स्वच्छता अभियानात उल्लखेनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिला होता. असे असताना सातारा-सज्जनगड रस्त्याच्या कडेला फेकलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येणारे पर्यटक, भाविक यांच्याकडून खेद व्यक्त करण्यात येत आहे.

शहरालगत उपनगरात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. मात्र अद्यापही नागरिकांत म्हणावी तशी जागृती झाली नाही. दंडात्मक कारवाई व अन्य उपाययोजना करण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी गरजेचे आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ स्वच्छतेचा डंका पिटून स्वच्छता होत नसते. रात्री 10 ते 11 दरम्यान उपनगरात घंटागाडी जर प्रत्येक वॉर्डात वेळेत फिरली नाही तर महिलासह सर्वच जण ओला किंवा सुका कचना उपनगरात शाळा, समाजमंदिर, ओढा या ठिकाणी अंधाराचा फायदा घेवून टाकतात.

-Ads-

सज्जनगड येथे चतुर्वेद संहिता पारायण व ऋगवेद स्वाहाकार सोहळा दि.24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या सोहळ्याचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातून दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत. पालिकेने रस्त्यावर थुंकणे, घाण टाकणे यासाठी 100 ते 500 रूपयांपर्यंत दंडाची आकारणी करून कारवाई करण्याची मोहिम दि.20 नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. ती तीव्र करण्यासाठी लक्ष पुरवावे अशी मागणी होवू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)