सातारा : शहीद जवानांच्या कुटुंबियांचा होणार सन्मान

जयहिंद फाऊंडेशनचा पुढाकार


धनादेशाचे होणार वितरण

सातारा- साताऱ्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील शाहिद झालेल्या 13 जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान दि. 30 एप्रिल रोजी साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी शाहिद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 21 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी चंद्रशेखर चोरगे, माजी सैनिक रवींद्र भोसले, स्वप्नील मांढरे, अभिमन्यू फरांदे, हणमंत चिकने, दत्ता साळुंखे, जयदीप भोसले, तुषार घोरपडे, वैभव कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी ले. जनरल व्यंकटेश माधव पाटील (निवृत्त सेनादल), एअर कामोडोर सुरेंद्र त्यागी (निवृत्त वायुदल), कमांडर शिवाजी तरटे (निवृत्त नौदल), प्राचार्य यशवंत पाटणे, कमांडर राजेंद्र शिंदे (व्यवस्थापक सैनिक कॅंटीन, सातारा), ले. आर. आर. जाधव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी), मेजर प्रतापराव भोसले (निवृत्त-अध्यक्ष राष्ट्रीय सैनिक संस्था, पुणे), निनादशेठ शिंगाडे, अरविंद जगताप, अभिनेत्री श्वेता शिंदे (निर्माती- लगीर झालं जी), तेजपाल वाघ आदी उपस्थित राहणार आहेत.

संदीप माने म्हणाले, सैनिक सर्वांसाठी शाहिद होतो. स्वतःचा त्याग करून सीमेवर रक्षण करतो. समाजात जागृती निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन, पूर्ण गाव व समाज पाठीमागे उभा राहिला पाहिजे, यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील 13 शाहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये सातारा 8, कोल्हापूर 3, सांगली 1, पुणे 1 शहिद जवान कुटुंबियांचा समावेश आहे. दोन शहिद सैनिकांच्या मुलांना 5 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

रवींद्र भोसले म्हणाले, शहिद जवानांनाच्या कुटुंबियांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी रक्षा बंधन, शहिद जवान पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)