सातारा शहर परिसरात खुलेआम गुटखाविक्री

शाहुपूरी- सातारा शहर व परिसरात पानटपऱ्यांवर गुटखाविक्री खुलेआम विक्री होत असून याकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पानटपऱ्यांवर गुटखा विकत मिळत असल्यामुळे तरूणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे.

अन्न भेसळ व पोलिस विभागाने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. सातारा शहरातील वाढेफाटा, मुख्य बसस्थानक, शिवराज पंप, राजवाडा आदी ठिकाणी पानटपऱ्यांमध्ये सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असते. काही पानटपरीवाल्यांनी घरात त्याचा साठा केला असल्यामुळे या अवैध व्यवसायातून व्यवसायिक यातून हजारो रूपये कमवत आहेत. त्यामुळे याकडे पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टपऱ्यांपुढे गुटख्याच्या पुड्यांचे कागद
सातारा शहरातील अनेक टपऱ्यांपुढे गुटख्याचे कागद पडलेले दिसून येतात. या गोष्टीवरून गुटखाबंदी झालीच नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे अन्न भेसळ विभाग व पोलिस प्रशासनाने याकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. व संबंधितावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)