सातारा शहरात पावसाची हजेरी

सातारा:प्रतिनिधी
सातारा शहर व परिसरात शुक्रवारी पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली.मान्सुनचा हंगाम संपत असताना परतीचा पाउस शेतकऱ्यांना दिलासा देत आहे.शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.दुपारनंतर जोरदार वारे आणि ढगांच्या गडगडाटासह सुमारे तासभर जोरदार पाउस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.पावसामुळे हवेतील उष्पा कमी झाला तरी पाउस थांबल्यावर मात्र उष्मा तीव्र झाला.त्यातच शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)