सातारा शहरातील वाहतुकीत बदल

सातारा – सातारा शहरातील पोवई नाक्‍यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे होणारी वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी शहरातील वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. सातारा बस स्थानकातून सांगली, कोल्हपुरकडे जाणाऱ्या एसटी बस, अवजड वाहने भुविकास बॅंक, जुना आरटीओ चौक मार्गे वाढे फाटा येथून जातील. सातारा बसस्थानकातून कोरेगाव,पुसेगाव, दहिवडीकडे जाणऱ्या एसटी बस पारंगे चौक, जिल्हा रूग्णालय, मुथा चौक, बांधकाम भवन, बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे जातील.

सातारा शहरात येणाऱ्या मार्गावर कलेले बदल पुढीलप्रमाणे कोल्हापुर, सांगलीकडून येणाऱ्या बसेस खेड फाटा, सैनिक नगर, सदर बझार, एलफिस्टन चर्च, रिमांडहोम, जुना आरटीओ मार्गे बसस्थानकात येतील. कास, बोगदा मार्गे येणाऱ्या बसेस सर्मथ मंदिर,मोती चौक, पोलीस मुख्यालय, प्रिया व्हरायटीज, मनाली हॉटेलमार्गे बसस्थानकाकडे जातील. बसस्थानकाडून पोवई नाका मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांनी बसस्थानक, प्रिया व्हरायटी, आर. के. बॅटरी कॉर्नर या पर्यायी मार्गाचा वापर करावा. बदललेल्या वाहतूक मार्गाचा वापर करून पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)