सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) : सातारा शहरातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे बांधकाम सुरु असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी वाहतूक सुरळीत व सुरक्षित होण्याच्या अनुषंगाने वाहतुक मार्गात बदल केले आहेत.
शाहु चौक ते पोवई नाका जाणारा मार्गावरील भिमाबाई आंबेडकर विद्यालय गेट ते रविवार पेठ, लोणार गल्लीमध्ये प्रवेश करणारा मार्गापर्यंत ग्रेड सेपरेटरच्या कामावरील वाहनांच्या व्यतिरिक्त सर्व वाहनांना ये-जा करणे बंद करण्यात आले आहे. मरिआई कॉम्प्लेक्‍स ते शाहु चौक हा मार्ग एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. वाहतुक नियंत्रण शाखा सातारा शहर ते लोणार गल्ली सावंत घर कॉर्नर चौक हा मार्ग एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. राजपथाकडून येऊन सिव्हील हॉस्पीटल सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय व गोडोलीकडे जाणारी सर्व वाहने जुने बगाडे हॉस्पीटल चौक – वाहतुक नियंत्रण शाखेसमोरुन – लोणार गल्ली, आय.डी.बी.आय. बॅंक ते मोनार्क चौक, बढीया पेट्रोलपंप अशी मार्गस्थ होतील. सातारा सिटी लॉकअप ते नगर पालिका कार्यालय हा मार्ग एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)