सातारा : व्यावसायिकाने शेतकऱ्यावर रोखले पिस्तुल

भुईंज : व्यवहारातील 800 रुपये परत करण्याच्या कारणावरुन शेळीपालन व्यावसायिक संजय जाधव याने भिवडी येथील शेतकऱ्यावर पिस्तुल रोखत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

भिवडी (ता. वाई) येथील शेतकरी श्रीकांत चंद्रशेखर मछले व वेलंग येथील शेळीपालन व्यावसायिक संजय मारुती जाधव यांच्या आर्थिक व्यवहार होते. मछले यांच्याकडून जाधव यांना व्यवहारीतल 800 रुपये देणे बाकी होते. शनिवारी 800 रुपयांची संजय जाधव हे श्रीकांत मछले यांच्या भिवडी येथील घरी गेले. याठिकाणी आल्यावर जाधव यांनी मछले यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. अखेरीस प्रकरण हातघाईवर आले. त्यानंतर राग अनावर झाल्याने संजय जाधव यांनी आपल्या गाडीत ठेवलेले पिस्तुल आणून मछले यांच्या छातीवर रोखले आणि पैसे दिली नाही तर गोळ्या घालुन ठार मारण्याची धमकी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखेरीस घाबरलेल्या मछले यांनी जाधव यांना आठशे रुपये देऊन टाकत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच पीएसआय साळी व हवालदार धायगुडे यांनी संशयित संजय जाधव यास ताब्यात घेऊन रात्री दीड वाजता गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)