सातारा: विहिरीत पडलेल्या हरणाला वाचविण्यात यश

कडेगांव – तडसर, ता. कडेगाव येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे आज जागतिक जैव विविधता दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला. तडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव यांची विहिर आहे. वनक्षेत्रात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक वन्यजिव पाण्याच्या शोधात बाहेर पडतात.

हे हरिण सुध्दा उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधात असलेले हरीण वनक्षेत्राचे तार कंपाऊड मधून बाहेर आले. तडसर गावाच्या हद्दीतील जाधव यांच्या विहिरीत पडले. ते विहिरीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. जाधव यांनी सकाळी साडेआठ वाजता वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर कडेगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल नितीन काळेल यांच्यासह वन विभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थ हरणाच्या सुटकेसाठी दाखल झाले. सर्वांनी जाळीच्या सहाय्याने केवळ अर्ध्या तासात हरणाला विहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीतून बाहेर व निसर्गाच्या सहवासात येताच अत्यानंदाने हरणाने टुनकण उडी मारत येथील वनक्षेत्रातील अधिवासात धूम ठोकली. हे रेस्क्‍यू ऑपरेशन यशस्वी झाल्याने वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांनीही समाधान व आनंद व्यक्त केला आणि खऱ्या अर्थाने जागतिक जैव विविधता दिन साजरा झाल्याची प्रतिक्रिया दिली.

या रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल नितीन काळेल, वनपाल ए. पी. सवाखंडे, मोहन महाडिक, वनरक्षक, जितेंद्र खराडे, सिकंदर मुल्ला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)