रहिमतपूर – रहिमतपूर बसस्थानकाबाहेर एसटी बसची वाट पाहत थांबलेल्या अल्पवयीन मुलीस घरी सोडतो म्हणून रस्त्यात विनयभंग करणाऱ्या युवकास अटक करण्यात आली आहे. शशिद्र धनाजी चव्हाण (वय 28, रा. किरोली, ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की दि. 13 रोजी शाळेतील अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी बसस्थानकाबाहेर थांबली होती. यावेळी पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या आरोपीने तिला घरी सोडतो म्हणून गाडीवर बसवले. काही अंतर गेल्यावर सुनसान रस्त्यावर गाडी थांबवून सदर मुलीला उचलून बाजूच्या शेतात नेऊन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपीने पळ काढला. या घटनेची नोंद राहिमतपूर पोलीस स्टेशन झाली होती.
सातारा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली राहिमतपूर पोलीस स्टेशनचे सपोनी श्रीगणेश कानुगडे यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी दहा पोलीसांचे पथक तयार केले होते. राहिमतपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय कांबळे, हवालदार विजय जाधव, जगदिश कणसे, प्रकाश इंगळे, संतोष राठोड, समाधान निकम, विनोद पवार, महेश पवार, दिपककुमार मांडवे, संजय मोरे, सागर पाटील या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करीत किरोली येथील शशिंद्र धनाजी चव्हाण या आरोपीस अटक केली आहे . सदर गुन्ह्याचा तपास पोलिस आधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीगणेश कानुगडे करीत आहेत .
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा