सातारा: विखळे कला महोत्सवात रसिक श्रोते मंत्रमुग्ध

मायणी – आजच्या तरुण पिढीची व्यक्तिगत आयुष्यापुरतीच बदलत चाललेली विचारसरणी ही सामाजिक वातावरणासाठी घातक असून त्यात बदल होणे आवश्‍यक आहे. याच विचाराने मायणी भाग शिक्षण संस्थेच्या विखळे येथील कमळेश्वर विद्यालयाने समाजात घडत असलेल्या विविध घटनांकडे समाजाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि विशेष करून आजच्या तरुण पिढीमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कला महोत्सव विद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या कला महोत्सवास रसिकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सिध्दनाथ यात्रा कमिटीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक पोपट मिंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश गीताने झाली त्यानंतर दमलेल्या बाबाची कहाणी, कौटुंबिक हिंसाचार, शिक्षणापासून वंचित मुले, बाल मजुरी, शेतकरी आत्महत्या, आई मुलातील नाते, स्त्रीभ्रूण हत्या, चांगले कर्म, मराठमोळ्या लावण्या, कोळी गीते अशा विविध विषयांवर आधारित नृत्य सादर करून मुला-मुलींनी उपस्थितांची मने जिंकली.

-Ads-

बालकलाकारांच्या कलागुणांना दाद देत रसिकांनीही बक्षिसांची उधळण करीत कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश तांबवेकर व चंद्रकांत पवार यांनी केले. महेश जाधव व श्रीनिवास चव्हाण यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले यावेळी विखळे परिसरातील ग्रामस्थ, महिला व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
20 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
0 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)