सातारा : वाहतूक पोलिसाला दमदाटी करणाऱ्या दोघांवर गुन्हा

सातारा शहरात वाहतूक नियमन करणार्‍या वाहतूक पोलिसाला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल धिरज चतुर यांनी तक्रार दिली आहे.

धिरज चतुर हे पोवई नाक्यावर बुधवारी वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी त्यांनी थांबवली . दुचाकी चालकाला गाडीची कागदपत्रे व वाहन चालवण्याचा परवाना मागितला. तसेच दुचाकीला पुढील नंबर प्लेट नसल्याने दंड भरावा लागेल असेही सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी चिडलेल्या दुचाकी चालकाने व त्याच्या मित्राने आम्ही तुला कोणतीही कागदपत्रे दाखवणार नाही. तूला काय करायचे ते कर असा दम दिला. यावेळी त्या दोघांनी चतुर यांना शिवीगाळ व दमदाटी करत कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल झाली आहे.

याप्रकरणी निखील हिंदुराव माने (रा.क्षेत्रमाहूली) व विवेक मोहन डांगे ( रा. सोमवार पेठ,सातारा) या दोघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)