सातारा: वाळू उपशावरून अधिकाऱ्यांची उडवा-उडवीची उत्तरे

file photo

कराड पंचायत समिती : सुरेखा पाटील यांचा आंदोलनाचा इशारा

कराड – सुपने परिसरातील नदीकाठच्या भागात रात्रीच्या वेळेस बेकायदेशीरपणे वाळू उपसा होत आहे. याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच स्थानिकांना माहिती देवूनही कारवाई केली जात नाही. याबाबत विचारले असता उतारे देणार नाही, अशी अधिकाऱ्यांकडून उत्तरे दिली जातात. एखाद्या पंचायत समिती सदस्याला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत स्वत: लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना वाळूउपसा बंद करण्याबाबत सूचना कराव्यात. अन्यथा, दोन दिवसात आंदोलन करणार आहे. माझे कर्तव्य बजावणार, कोणीही अडवू शकत नाही, अशी रोखठोम भूमिका पंचायत समितीच्या सदस्या सुरेखा पाटील यांनी व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे सभापती शिवाजी सर्वगोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विषयपत्रिकेत एकूण 23 विषय होते. त्यापैकी महत्त्वाच्या विषयांवर सभेत चर्चा करण्यात येवून सभा आटोपण्यात आली. सभेस सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्वगोड यांनी सर्व अधिकाऱ्यांना सदस्यांच्या तक्रारी महत्त्वाच्या मानून त्याचे निवारण करण्याचा प्र्रयत्न करण्याबाबत सूचना केल्या.
पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील यांनी सुपने परिसरात रात्रीच्या वेळेत बेकायदेशीरपणे वाळूउपसा होत असल्याबाबत त्यांनी तक्रार केली.

यावेळी अंगणवाडी शाळेच्या दर्जाबाबत माहिती प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात आली. माजी उपसभापती रमेश देशमुख म्हणाले, अंगणवाड्यांचा अथवा जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारणे महत्त्वाचा आहे. परंतु त्याला दर्जा तेव्हाच येईल जेव्हा अंगणवाड्यातील मुलांची संख्या वाढेल. आपल्या अधिकाऱ्यांची मुले कोणत्या शाळेत जातात, याची माहिती घेवून अहवाल तयार करावा, अशी मागणी त्यांनी केली. पाणी पुरवठा, शिक्षण विभाग, कृषी विषयक, ग्रामपंचायत विभाग, बांधकाम, लघुपाटबंधारे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)