सातारा: वाघेरीत दोन तपानंतरही दारुबंदी कायम

दारुबंदीबरोबर गुटखा बंदीची गरज
गेल्या तेरा वर्षापासून वाघेरीच्या गावकऱ्यांनी दारुला वेशीबाहेर ठेवले आहे. गावात हौशी अनेक आहेत. परंतु, गावाच्या निर्णयापुढे तळीरामांचे धाडस होत नाही. या दारुबंदीमुळे गावातील तरुणाई व्यसनापासून दूर राहिली आहे. मात्र या दारुबंदीबरोबर गावात गुटखाबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यादृष्टीने गावकऱ्यांनी बैठकीत निर्णय घेवून आदर्श निर्माण करावा, अशीही अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

जहॉंगीर पटेल

गुटखाबंदी गावकऱ्यांची अपेक्षा

ओगलेवाडी – वाघेरी (ता. कराड) येथील दारुबंदीला एक, दोन नव्हे तब्बल एक तपाहून अर्थात तेरा वर्षे पुर्ण झाली असून ही दारुबंदी अशीच पुढे कायम राहणार आहे, अशी गावातील लोकांनी संकल्पना केली आहे. तेरा वर्षापूर्वी या गावामध्ये दारुने अक्षरश: हैदोस घातला होता. पाचशे उंबरा असलेल्या या गावामध्ये तीन दारुची दुकाने होती. परिणामी गावातील तरुण वर्ग व्यसनाधिनतेकडे वळला होता. दररोज मारामारी, चोऱ्या, घरातील भांडणे अशा प्रकारामुळे गावकरी खास करुन महिला वर्ग हैराण झाला होता. गावकऱ्यांनी तरुण पिढी वाचवण्यासाठी दारु हद्दपार करण्यासाठी निश्‍चय केला.

2005 साली तत्कालीन तरुण सरपंच इम्रान पटेल यांनी आपल्या कार्यकालाच्या सुरुवातीलाच गावातील काही तरुणांच्या मदतीने दारुबंदी हा विषय हाती घेतला व तो तडीसही नेला. आज दारुबंदीच्या बाबतीत वाघेरी गाव पूर्ण मुक्त आहे. तीन दुकाने बंद करण्यासाठी त्यांना सुमारे तीन महिन्याचा कालावधी गेला. परंतु त्यांनी ती दुकाने पुर्णपणे बंद केली. ही दुकाने बंद करताना गावातील काही समाजकंटकाकडून अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करुन ही दुकाने बंद करण्यात वाघेरी गावचे माजी सरपंच इम्रान पटेल यांनी सर्व सदस्यांना व गावकऱ्यांना विश्वासात घेवून ग्रामसभेमध्ये ठराव करुन घेतला. व ही दारु दुकाने बंद करुन इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला. दारुमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त होतात. हे येथील लोकांनी ओळखून या बंदीला कोणीही विरोध केला नाही. परिणामी आज या दारुबंदीला तेरा वर्षे पुर्ण होत आहेत. येणाऱ्या काळात या गावातील गुटखाबंदी करण्यासाठीही प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा येथील ग्रामस्थांची आहे.
यात्राकालावधीतही दारुला थारा नाही.

दारुबंदीमुळे या गावात बोटावर मोजण्या इतकेच मद्यपी आहेत. हे येथील विशेष आहे. दारु समाजाच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते. गावात यात्रा असो की मोठे कार्यकम असोत. दारुला मात्र कोणत्याही परिस्थितीत येथे थारा दिला जात नाही. गावात अनेक धर्माची लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. दारुबंदीसाठी सर्वांनी एकी दाखविल्यामुळेच ही दारुबंदी यशस्वी झाल्याचे चित्र आज पहायला मिळत आहे. यापुढेही ही दारुबंदी अशीच सुरु राहणार असा या गावातील लोकांनी संकल्प केला आहे. या गावातील दारुबंदी ही इतर गावांसाठी आदर्शवत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)