सातारा लोकसभेसाठी शिवसौनिकांच्या गाठीभेटी वेगात

भाजपचे पुरुषोत्तम जाधवांना झुकते माप
सातारा दि-  सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यमान खा. उदयनराजे भोसले यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवारांनी सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. तर दुसऱ्या बाजूला पुरुषोत्तम जाधव यांना भाजपने झुकते माप देण्याच्या तयारीत असतानाच शिवसेनेच्या सातारा लोकसभा मतदार संघात घुसखोरी सुरु केली आहे. सध्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या गाठीभेटी घेण्याचा वेगाने हालचाली सुरू केली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर हे 1995 साली निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात उभे राहिलेले उदयनराजे यांना अपक्ष उमेदवार म्हणून सुमारे एक लाख मते मिळाली होती. या गोष्टीला आता वीस वर्षे लोटली. त्यानंतर बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. सध्या केंद्र व राज्यात भाजप-सेनेचे सरकार सत्तेवर असले तरी शिवसेना मनापासून या राज्यकारभारात एकरूप झाली नाही. अनेकदा विरोधकांची भूमिका पार पाडली आहे.सातारा जिल्ह्यातील राजकारणात छत्रपती राजघराण्याचा प्रभाव असला तरी शिवसेनेचे शिवसैनिक सेना नेत्यांचे आदेश मानून काम करीत आहेत. शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानूगडे-पाटील यांना राज्यपातळीवर संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे साताऱ्यात शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सातारा येथील शिवसेनेच्या मेळाव्यात खा. उदयनराजे भोसले यांना लोकसभेत बिनविरोध निवड करण्यात यावी अशी मागणी केली होती.या मागणीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज झाले. त्यांना बळ देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील काही भागात तालुक्‍यात शिवसैनिकांची निर्णायक ताकद आहे. ते एकजुटीने प्रचारात उतरल्यास निकालावर नक्की परिणाम होऊ शकतो.

-Ads-

सातारा लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली तर सध्या खासदारकीच्या उमेदवारीची अपेक्षा असणारे चंद्रकांत जाधव व पुरुषोत्तम जाधव या दोन्ही जाधवांच्या पैकी एकाला माघार घ्यावी लागेल अन्यथा पुन्हा एकदा किमन चौरंगी किंवा बहुरंगी निवडणूक अटळ आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खा.उदयनराजे भोसले किंवा श्रीनिवास पाटील, वसंतराव मानकुमरे या पैकी कोणाला उमेदवारी जाहीर करतील याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. शिवसेना प्रमुख जो आदेश देतील तो पाळण्यात कुठे ही शिवसैनिक कमी पडणार नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)