सातारा लोकसभेला माझा विषय नाही : ना. बानुगडे पाटील

ना. बानुगडे-पाटील: महाराष्ट्रात सेनेची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न

सातारा – आगामी निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. राज्यात एक हाती सत्ता आणून मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला पाहिजे, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आगामी सातारा लोकसभा मतदारसंघातून माझा विषयच नाही, असे स्पष्टीकरण ना. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, नुकतेच सातारा जिल्ह्यात भाजपने सातारा लोकसभेसह पाच विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना बानुगडे-पाटील म्हणाले, शिवसेना स्वबळावर सर्व जागांवर लढणार आहे . त्यामुळे भाजपच्या दाव्याकडे लक्ष देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जिल्ह्यातील लोकसभेसह सर्व विधानसभा मतदारसंघात सेनेची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.

मागील निवडणुकीत अपयश आले असले तरी आगामी निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढून अनेक ठीकाणी यश मिळालेले निश्‍चितपणे दिसून येईल. तर नुकतेच जिल्हा प्रमुखपदावरून हर्षल कदम यांना हटविण्यात असल्याबाबत स्थानिक राजकारण आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, तसे कोणतेही राजकारण नसून सांगली जिल्ह्यात 27 तर सातारा जिल्ह्यात 12 पदांवर बदल करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)