सातारा : लाचेच्या रक्कमेसह फौजदार पळाला

 

दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार लाचेच्या रक्कमेसह पळाल्याची घटना घडली आहे. दहिवडी येथील एका बिअर बारचा चुकीचा अहवाल न पाठवण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती.

त्यानुसार दहिवडी येथे सापळा लावण्यात आला होता. मात्र सापळा लागल्याची कुणकुण लागताच लाचखोर फौजदार दबडे त्या रकमेसह पळाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी फौजदार सतिश राजाराम दबडे याने लाच मागितली. ही तक्रार सातारा एसीबी विभागात दाखल झाली होती.

त्यानुसार एसीबीचे पथक शुक्रवारी दहिवडी येथे सापळा लावून थांबले होते. मात्र आपल्यावर सापळा लागल्याचा संशय दबडे याला आला. त्यानंतर त्याने तक्रारदार यांच्याकडून स्विकारलेल्या लाचेच्या रकमेसह पोबारा केला.

दरम्यान दबडे याने पळुन जाताना त्याच्या गाडीचा धक्का पोलिसांना दिल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दहिवडी येतील विश्राम गृहावर थांबले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)