सातारा रेल्वेस्टेशन होणार ऐतिहासिक स्टेशन म्हणून विकसित

खा.उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश; रेल्वे संबंधि प्रश्‍न तातडीने सोडवण्याची मागणी

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा या ऐतिहासिक भुमीवरील सातारा रेल्वेस्टेशन हे ऐतिहासिक रेल्वेस्टेशन म्हणून विकसित करावे यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री मा.सुरेश प्रभु आणि विद्यमान रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मान्यता दिल्याची माहिती खा.उदयनराजे भोसले यांनी पत्रकव्दारे दिली आहे.

रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गात येणा-या सन्माननीय संसद सदस्यांच्या रेल्वे संबंधीच्या प्रश्‍नाबाबत रेल्वेच्या महाप्रबंधकांनी पुणे येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीत सातारा रेल्वे स्टेशनचा ऐतिहासिक स्टेशन म्हणून विकास करावा त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करावा, लोणंदच्या औद्योगिक वसाहतीलगत रेल्वे गुडस्‌ शेड उभारणे, रेल्वेच्या मालाची चढ-उतार करण्यासाठी, कायद्याने मान्यता असलेल्या रजिस्टर माथाडी बोर्डातील माथाडी कामगारच असेल पाहीजेत, बहिस्थ व्यक्‍तींचे तेथे चोचले पुरवले जावू नयेत, कराड-सातारा-पुणे डेली शटल सेवा सुरु करावी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतिकरण, तसेच या मार्गावर गतीमान रेल्वे वाहतुकीसाठी दुहेरी लोहमार्ग उभारणे, कराड-चिपळुण नवीन लोहमार्ग यासह वाठारस्टेशन, रहिमतपूर,मसूर येथे रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी ओव्हरब्रीज उभारणेच्या कामांचा खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या अधिका-यांसमवेत आढावा घेतला. त्याचबरोबर ही सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण झाली पाहीजे, त्यामुळे लोकांचे हित साधले जाणार आहे अशी आग्रही भूमिका खा. उदयनराजे यांनी मांडली.

यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे ते मिरज या लोहमार्गावर सध्या एकच रेल्वे मार्ग आहे. त्याचे दुहेरी करणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरीता ज्यांची जमिन जाणार आहे त्यांना मोबदला दिला जावून, कोणत्याही परिस्थिांतीत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम गतीने , वेळेत पूर्ण होईल अशी कार्यवाही करावी अशी मागणी केली. त्यावेळी विविध मुद्यांवर आणि कामां संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी सूचना केल्या.

यावेळी खासदार अनिल शिरोळे, खा.वंदना चव्हाण, खा.आढळराव पाटील,खा.संजयकाका पाटील,खा.विजयसिंह मोहिते पाटील,खा. शरद बनसोडे, खा. सदाभाउ लोखंडे, हे संसद सदस्य तर सेन्ट्रल रेल्वेचे महाप्रबंधक एस.एम.शर्मा, पुणे डीआरएम देवूस्कर, मुख्याधिकारी तिवारी, वाणिज्य अधिकारी कृष्णा पाटील, यांचेसह अशोक सावंत, काका धुमाळ, माजी नगरसेवक संजय शिंदे, संग्राम बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)