सातारा : रुग्णवाहिकेला ‘कटप्रॅक्‍टिस’चा आजार

प्रशांत जाधव 

सरकारी रुग्णालयारऐवजी खाजगीकडे ओढा


गोरगरिबांची आर्थिक हेळसांड

सातारा – आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना “गोल्डन पीरियड’मध्ये तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने रुग्णवाहिका हा अभिनव उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाला चांगल्या सेवेमुळे महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, दिवस सरतील तसे नव्याचे नवेपण संपताना दिसत आहे. कधी गाडी उपलब्ध नसणे, कधी डॉक्‍टर नसणे या तक्रारी असतानाच या रुग्णवाहिकेत काम करणाऱ्या काही डॉक्‍टरांचा रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याकडे कल वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक हेळसांड होत आहे.

काही दिवसांपूर्वी मायणी म्हसवड रोडला पडळ फाटा येथे एका युवकाचा अपघात झाला होता. त्यानंतर तिथे असलेल्या काही लोकांनी 108 या रुग्नवाहिकेला फोन करुन गाडी बोलावून घेतली व वडुज येथे सरकारी दवाखान्यात जायच असे ठरवून निघाले. मात्र, रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्‍टरांनी पेशंटला सातारला घेऊन जावे लागेल. पेशंट गंभीर असल्याचे सांगुन रुग्णवाहिका थेट साताऱ्यातील एका खाजगी हॉस्पीटला घेत पेशंट तिथे सोडला.

पेशंटच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊयात असे सांगताच पेशंट गंभीर आहे अन्‌ तिथे कोण दखल घेत नाही असे सांगुन तिकडे जाण्यास नकार दिल्याची माहिती त्या अपघातग्रस्त युवकाच्या नातेवाईकांनी दिली.

राज्यभरात अनेक रुग्णांना जीवदान देणारी 108 मोजक्‍या डॉक्‍टरांना झालेल्या कटप्राक्‍टीसच्या आजारामुळे बदनाम होताना दिसत आहे. ग्रामीण भागात या सेवेविषयी तक्रारी वाढत आहेत.

काहीवेळा वारंवार संपर्क साधूनही रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागात अन्य रुग्णवाहिका किवा खाजगी वाहनाची सोय उपलब्ध करावी लागत असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

साधारणत: चार वर्षांपूर्वी आरोग्य विभागाने 108 रुग्णवाहिका ही संकल्पना मांडली. रस्ते-महामार्ग परिसरातील अपगातग्रस्तांना, ग्रामीण विशेषत: दुर्गम भागात गरोदर मातेला रुग्णालयात नेणे, कुपोषित बालकांना व्हीसीडीसी किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षात आणणे अशा विविध वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी मोफत रुग्णवाहिका देणे या हेतूने सुरु झालेली ही योजना कटप्राक्‍टीसच्या फेऱ्यात सापडली आहे.

जिल्ह्याचा विचार केल्यास 46 रुग्णवाहिका असून त्या 108 या क्रमांकावर सेवा देत आहेत. सुरुवातीच्या काळात हजारो रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला. त्यात गरोदर मातांची प्रसुतीही या रुग्णवाहिकेत झाल्याने समाधानकारक सेवा देण्यात आली. मात्र, जशी वर्षे सरली, तसे सेवासुविधेत काही प्रमाणात खंड पडु लागला, तर काही ठिकाणी कटप्राक्‍टिसच्या नव्या फंड्यामुळे हि योजना बदनाम होऊ लागली आहे.

एका रुग्णवाहिकेला 30 किलोमीटरच्या परिघात रुग्णसेवा देणे बंधनकारक असताना बऱ्याचदा क्रमांकाशी संपर्क साधल्यावर आमच्याकडे वाहन नाही, वाहन असले तर चालक नाही.. अशी कारणे देत सेवा देण्यास ग्रामीण भागात टाळाटाळ केली जाते.
काही सक्रिय लोकप्रतिनिधी 108च्या रुग्णवाहिकेने केवळ आपल्या भागातच सेवा द्यावी असा आग्रह धरतात त्यामुळे 108 रुग्णवाहिकेच्या कामकाजात राजकारणाचा सिरकाव झाला आहे का? असा प्रश्‍न पडतो.

अशी शोधतात पळवाट
या रुग्णवाहिकेला काम करणारे काही डॉक्‍टरांचे खाजगी डॉक्‍टरांशी संबंध असल्याने पेंशट तिकडे नेहण्याकडे जास्त कल असतो. मात्र, ने पेशंट सरकारी हॉस्पिटलला घेऊन जावे असा शिरस्ता असल्याने पेशंट खाजगी हॉस्पिटलला सोडून त्याच्या नातेवाईकाला एका बाजूला बोलवून रजिस्टर वर सही करा असे सांगून रजिस्टर सोबत संमतीपत्रावर सही घेत नातेवाईकांनीच खाजगी हॉस्पिटलाला घेऊन जाण्याची संमती दिली असा कांगावा केला जातो.

डॉक्‍टर म्हणाले खाजगीत चला
108 च्या डॉक्‍टरांनी आम्हाला रुग्णवाहिकेत बसल्याबरोबर पेशंट सातारा येथे न्यावा लागेल असे सांगुन जिल्हा रुग्णालयात दखल घेत नाहीत असे सांगुन साताऱ्यातील खाजगी हॉस्पिटलाला घेऊन गेले. असे अपघातग्रस्त युवकाच्या नातेवाईकांनी “प्रभात’ला सांगितले.

नातेवाईकांनीच संमती दिली
पेशंटच्या नातेवाईकांना घटनेचे गांभीर्य सांगितल्याने व वडूज अथव जिल्हा रुग्णालयात मेंदु तज्ञ नसल्याची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनीच संमती दिल्याचे डॉक्‍टरांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)