सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज महत्वपुर्ण बैठक

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार दि.21 रोजी 1 वाजता राष्ट्रवादी भवन, सातारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील खासदार व आमदार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रतिनिधींची महत्वपुर्ण बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत पक्षाची जिल्हा कार्यकारणी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्या निवडीबाबत चर्चा होणार असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची रणनिती व ध्येयधोरणाबाबत सुरेश घुले हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच जि.प.सदस्य व नगरसेवकांनी या बैठकीस रहावे, असे आवाहन जिल्हासरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)