सातारा: राजेशाही आणा, मग दाखवतोच

जिल्हापरिषदेसमोर आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेटीप्रसंगी बोलताना खा.उदयनराजे भोसले शेजारी संघटनेचे अध्यक्ष विजय गायकवाड, संदिप शिंदे, सुनिल काटकर आदी.

खा.उदयनराजे : आंदोलनकर्त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही

सातारा – मागील तीन दिवसांपासून जिल्हापरिषदेसमोर आंदोलन करित असलेल्या आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांची खा.उदयनराजे भोसले यांनी गुरूवारी आंदोलनस्थळी भेट दिली.

-Ads-

भेटी दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रश्‍नांवरून बोलताना, लोकांना खुप लोकशाही हवी होती. आज लोकशाही असताना लोकांचे प्रश्‍न सुटत नाहीत. तुम्ही एकदा राजेशाही आणा, मग दाखवतोच असे आवाहन त्यांनी करून टाकले तसेच तुमचे प्रश्‍न मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवून लवकरात सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. मागील काही दिवसांपासून खा.उदयनराजे यांनी सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनस्थळी भेटी देण्याचे सातत्य गुरूवारी ही कायम ठेवले. मागील काही दिवसांपुर्वी पाटण येथे धरणग्रस्तांच्या आंदोलनाला तर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुर्ली, ता. कोरेगाव येथी कदम दांपत्याचे उपोषण खा.उदयनराजे यांनी भेट देवून कारवाईचे आश्‍वासन देत उपोषण मागे घेण्यात आले. तर गुरूवारी दुपारी खा. उदयनराजे यांनी जिल्हापरिषदेसमोर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या काम बंद व धरणे आंदोलनाला भेट दिली. लोकशाही मार्गाने आंदोलन करून ही कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याचे पाहून खा.उदयनराजे संतप्त झाल्याचे दिसून आले आणि यावेळी बोलताना त्यांनी तुम्हाला लोकशाही हवी होती, परंतु लोकशाहीत अशा प्रकारे हेळसांड होत असेल तर राजेशाही आणा, मग दाखवतोच असे सांगत कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही दिली तसेच जाता जाता आंदोलनकर्त्यांना त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने लव्ह यु ऑल म्हणत निरोप घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)