रहिमतपूर – रहिमतपूर येथील विकास शाम पवार याने राहत्या घरात साडीच्या पदराने व नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याबाबत रहिमतपूर पोलीसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रोजी सकाळी अष्टविनायक नगर औंधरोड रहिमतपूर येथील राहत्या घरात विकास शाम पवार वय 21 रा. अष्टविनायक नगर औंधरोड रहिमतपूर याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रहिमतपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून तपास हवालदार आर. बी. परदेशी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)