सातारा रस्त्यावर अतिक्रमनांची मांदिआळी!

रस्त्याचे विदृपीकरण
कात्रज चौक, संतोषनगर भाजी मंडई,दत्तनगर चौक, त्रिमृत्ती चौक, धनकवडी शेवटचा बस स्टॉप, बालाजीनगर अशा सर्वच ठिकाणी अतिक्रमणे वाढल्याचे दिसत आहे. तसेच, क्षेत्रीय कार्यालयासमोर विकसित होणाऱ्या बीआरटी रस्त्यावर अतिक्रमांचा डोंगर उभा राहात असून सुंदर रस्त्याचे विदृपीकरण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

धनकवडी-सहकारनगर अतिक्रमन विभागाचे दुर्लक्ष

कात्रज – पुणे सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज बीआरटी रस्ता विकसनाचे काम सुरू असून बालाजीनगर ते कात्रज काम पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, अर्बन डिझाईनमधून विकसित होणाऱ्या रस्त्याला अतिक्रमाचे ग्रहन लागणे सुरू झाले आहे. पथारीवाले, फळ विक्रेते व टोपी-गॉगल अशी जागोजागी दुकाने थाटल्याचे विदारक चित्र दिसत आहे. त्यामुळे अचानक थांबणाऱ्या ग्राहकामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

-Ads-

स्वारगेट ते कात्रज बीआरटी विकसनाचे काम अर्बन डिझाईनमधून 75 कोटी खर्च करून केले जात आहे. यामध्ये बीआरटी रस्ता, पदपथ, सायकल ट्रॅक व रुंदीकरण करण्यात येत आहे. तसेच, नियोजित बसस्टॉप व स्वच्छता गृह उभारले जात आहेत. तसेच, या मार्गावरील शंकर महाराज उड्डाणपुल व स्वारगेट उड्डाण पुल यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकासह स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या विकसित होणाऱ्या रस्त्यावर हातगाडीवाले यांच्या अतिक्रमनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, पदपथ व सायकल ट्रॅकवर बसवण्यात आले ब्लॉकवर हॉटेल मालकांनी पार्किंग केले आहे. त्यामुळे सायंकाळी मुख्य रस्ता व पदपथावर सर्रास पार्किंग झाल्याचे विदारक चित्र आहे. पुणे महानगरपालिकेने कोट्यवधी निधी खर्चुन विकसित केलेला रस्ता, पदपथ नागरिकांसाठी आहे का हॉटेल पार्किंगसाठी हेच समजायला मार्ग नाही, असा नाराजीचा सूर नागरिकांमध्ये आहे. याबाबत मनपा अतिक्रमण विभाग आणि स्थानिक नगरसेवकांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)