सातारा रस्ता ‘बीआरटी’ला पूर्णत्वास 31 मे ‘डेडलाइन’

ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण करून घ्या


महापौरांचे प्रशासनाला आदेश


रस्त्याच्या कडेला तात्पुरते बसथांबे उभारावेत

पुणे- “पुणे स्ट्रीट प्रोग्राम’अंतर्गत स्वारगेट ते सातारा रस्त्याची फेररचना करण्यात येत आहेत. यांतर्गत 5.4 किमी अंतराच्या या मार्गावरील “बीआरटी’ थांब्यांची रचना तसेच मार्गात काही ठिकाणी बदल करण्यात येत आहेत. हे काम 31 मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनास दिले आहे.

सातारा रस्ता बीआरटी मार्गाची महापौर टिळक यांनी मंगळवारी पाहणी केली. मात्र, हे काम संथ सुरू असल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहवी लागत आहे. त्यामुळे तातडीने ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी महिला आणि बाल कल्याण समिती अध्यक्षा राणी भोसले उपस्थित होत्या.

महापौर म्हणाल्या, या मार्गावरील बीआरटी मार्गांची रचना तसेच बस थांब्यांची रचना बदल करण्यात येत आहे. या मार्गातील अहिल्यादेवी चौक ते भारती विद्यापीठापर्यंत बीआरटी मार्गाचे काम रखडले आहे. तर बस थांबेही अडचणीच्या जागी असून नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा स्थितीत रस्त्याच्या कडेला तात्पुरते बसथांबे उभारण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.

या शिवाय, या संपूर्ण मार्गावर या रस्त्याचे डिझाईन करणाऱ्या सल्लागार कंपनीने चार ठिकाणी स्वच्छतागृहे प्रस्तावित केली होती. मात्र, एकाही ठिकाणी स्वच्छतागृह उभारली नाही. त्यामुळे जागा तातडीने शोधून ती उभारण्याच्या सूचना दिल्याचेही महापौर म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)