सातारा: युवकांच्या पॉकेटमनीला इंधनदरवाढीची झळ

विरोधकांना नाही सोयरसुतक
इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांकडून लोकशाहीमार्गाने आंदोलने होणे अपेक्षित असते. परंतु मागील सात महिन्यात वेळोवळी दरवाढ होवून ही अद्याप सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आणि सत्तेत असून विरोधाची भूमिका घेणाऱ्या शिवसेना आदी.पक्षांच्या एका ही पदाधिकाऱ्यांने आंदोलनाची भूमिका घेतली नाही. एकूणच जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसणाऱ्या आर्थिक भुर्दंडाबाबत कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीने संताप:महागाईत आणखी होणार वाढ

सातारा – मागील सात महिन्यांपासून आणि आता कर्नाटक राज्याच्या निवडणूकीनंतर देशात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साताऱ्यात प्रति.लिटर पेट्रोल हे 85 रूपयांपर्यत तर डिझेल 72 रूपयांपर्यत पोहचल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायावर झाला आहे परिणामी महागाईमध्ये आणखी भर पडणार आहे. तसेच पेट्रोल दरवाढीचा फटका सर्वसामान्य नोकरदारांना बसत आहे त्याचबरोबर महाविद्यालयीन युवक आणि विद्यार्थ्यांच्या पॉकेटमनीला झळ बसत असल्याचे चित्र साताऱ्यात आहे.

अच्छे दिन आणणार स्वप्न दाखवून सत्तेवर आलेले भाजप सरकार आता इंधन दरवाढीच्या निमित्ताने सर्वसामान्यांना बुरे दिन आणण्याच्या भूमिकेत आहे. केंद्र सरकारच्या कंपन्यानी मागील सात दिवसात पेट्रोल व डिझेलच्या दरात 2 ते 2.50 रूपये प्रति लिटर दराने वाढ केली आहे. त्यात महिनाभरात बॅरल महागण्याची शक्‍यता असून त्यामुळे महागाईत 0.30 टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता आर्थिक संशोधकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, इंधन दरवाढीचा फटका व्यवसायिकांसह युवक वर्गाच्या खिशाला बसताना दिसून येत आहे. पेट्रोलने 85 पार केल्याने शंभराची नोट एका झटक्‍यात गायब होत असून त्यामुळे पॉकेटमनीला चांगलीच झळ बसताना दिसून येत आहे.

विमा, टोल आणि आता डिझेलच्या दरात सतत व मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाढीमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक त्या व्यवसायापासून दूर चालला आहे. इतर राज्यापेंक्षा महाराष्ट्रात इंधनावर लादलेल्या कराचे प्रमाण अधिक आहे. त्या प्रकारात केंद्र सरकार जाणीवपुर्वक लक्ष घालत नाही. परिणामी डिझेलची वाढ झाली तरी गाडीमालकांना त्याचा मोबदला व्यवसायिकांकडून मिळत नाही. परिणामी संपुर्ण व्यवसाय ठप्प होत आहे. – प्रकाश गवळी संचालक: ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)