सातारा : मुस्लीम बांधवांचे चंद्रकांतदादांना साकडे

कब्रस्तान निधीच्या पळवापळवीवरुन तीव्र नाराजी व्यक्त

सातारा : आयटीआय रोडवरील कब्रस्तानचा निधी भाजपचे माजी गटनेते धनंजय जांभळे यांनी पळवल्याचा कारनामा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर उघड झाला आहे. या मुस्लीम बांधवांनी व नेत्यांनी थेट पत्रव्यवहाराद्वारे तीव्र नाराजीसाताऱ्यातील मुस्लीम बांधवांनी व नेत्यांनी थेट पत्रव्यवहाराद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परस्पर वळवण्यात आलेला निधी हा कब्रस्तानच्या विकसनासाठी वापरला जावा अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या सातारा शहरावर अभ्यासपूर्ण लोभ ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सातारा जिल्हयासाठी पंचवीस कोटी रुपये विशेष अनुदान देण्याचा फडणवीस यांचा प्रयोग यशस्वी ठरला. सातारा शहराच्या वाट्याला आलेल्या साडे चार कोटीपैकी तब्बल पन्नास लाख रूपयांचा निधी भाजपचे कट्टर कार्यकर्ते रविंद्र पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले होते. जुलै 2017 मध्ये मंजूर झालेला हा निधी पालिका निवडणूकीनंतर गटनेते बनलेल्या धनंजय जांभळे यांनी पुढच्या नऊ महिन्यात कागदांची फिरवा फिरवी करत हातोहात वळवला.

सदर भाग त्रिशंकू असल्याचे कारण सांगून हा निधी वळवण्यात आला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्राचा आधार घेउन जिल्हा प्रकल्प संचालकांची निधी वर्ग करण्याची परवानगी मार्च 2018 मध्ये मिळवली. जे मूळपत्र त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले त्याची साक्षांकित प्रत पालिकेच्या रेकॉर्ड ला उपलब्धच नाही ही धक्कादायक बाब लक्षात आली. तोपर्यंत जांभळे यांनी वॉर्ड क्रमांक 16 साठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा ढेकर दिला होता.

निधीच्या पळवापळवीने सार्वत्रिक संताप
सातारा शहरात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या मुस्लीम बांधवांची संख्या दखल घेण्याजोगी इतपत निश्‍चितच आहे. मात्र मुस्लीम समाजासाठी असणाऱ्या आयटीआय रोडवरील कब्रस्तानच्या जागेची योग्य देखभालीअभावी परवड सुरू आहे. आवश्‍यक सुविधा नसल्याने मुस्लीम बांधवांची खूपच अडचण होते. भाजप सरकारच्या वतीने कब्रस्तान विकसनाचे विधायक पाऊल उचलले जात असताना त्याला भाजपमधल्याच अंर्तगत राजकारणाचा फटका बसून चांगल्या कामाला खीळ बसली. आघाडी शासनाच्या काळातही मनोमिलनाने कधीच इतका निधी उपलब्ध करून दिला नव्हता.

यातील राजकारणाचा सोयीस्करपणा हा भाग वगळला तर कब्रस्तान विकसनाची मोठी संधी होती. त्यासाठीच मुस्लीम समाजातील समविचारी बांधव आणि संघटना एकत्र आल्या असून तो निधी परत आणण्यासाठी संघटनात्मक हालचाली गतिमान झाल्या आहेत. सातारा पालिकेचे नियोजन सभापती अल्लाउद्दीन शेखभारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चाचे कादर बशीर पठाण तसेच गेंडामाळ कब्रस्तानच्या वतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी साकडे घालण्यात आले आहे. ही निवेदने कोल्हापूरच्या बैठकीत चंद्रकांत दादा यांना पोहोच झाली आहेत.

सर्वच निवेदनांमध्ये कब्रस्तानचा विषय हातात घेउन त्याला निधी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद देण्यात आले आहेत. मात्र परस्पर वळवण्यात आलेला निधी कब्रस्तान विकसनासाठीच वापरण्यात यावा अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने दखल घेत वळवला गेलेला निधी कब्रस्तान विकसनालाच दयावा अशा थेट सूचना जिल्हाधिकारी सातारा यांना केल्याचे समजते. चौकट दादांचा कोल्हापुरी पाहुणचार निधी पळवापळवीचे प्रकरण समोर आल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी माजी गटनेते धनंजय जांभळे यांचा खास कोल्हापुरी पाहुणचार केल्याचे वृत्त आहे. गटनेत्याच्या निवडीबरोबर खास ठेवणीतले शाब्दिक झटके दादांनी जांभळेना दिल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)