सातारा: मुलांच्या सुरक्षेचं काय?

पालकांकडूनही दुर्लक्ष
अनेक वेळा पालक मुलांना एकट्यालाच पोहण्यासाठी पाठवत असतात. मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी आपल्या मुलांसोबत येणे गरजेचे आहे. सुरक्षेअभावीच या दुर्घटना घडत असून यामध्ये पालकांकडून होत असलेले दुर्लक्ष या घटनांना जबाबदार ठरत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना पोहण्यासाठी एकटे सोडू नये, तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी स्वत: त्यांच्यासोबत जाणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यामुळे कालव्यांवर पोहण्यासाठी गर्दी, दुर्घटनांच्या प्रमाणातही वाढ

वाई – उन्हाळ्यामुळे ज्याप्रकारे स्विमिंग टॅंकवर पोहण्यासाठी गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे धोमच्या कालव्यांवरही मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे कालव्यांमधील पोहणे हे जिवावर बेतत आहे. त्यामुळे कालव्यावर पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला असून संबंधित मुलांच्या पालकांनी मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.

खबरदारीचे उपाय
1 घरातील लहाग्यांना पालकांबरोबर पोहाय पाटविणे.
2 धोकादायक प्रवाहात न पोहणे.
3 नवीन शिकणारांना टयुब, कॅन किंवा पोहण्यास शिकण्याचे किट घालणे.
4 पोहताना स्टॅण्ट बाजी न करणे.
5 कॅनॉलच्या किंवा नदी पात्रात पृष्ठभाग चांगला आहे का याची खात्री करणे.
6 पाण्याची उंची पाहून उड्या मारणे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिकच कडक असून गेल्या महिनाभरात पाऱ्याने 40 शी गाठली आहे. उन्हामुळे असाह्य झालेले नागरिकही कधीनव्हे ते पोहण्यासाठी स्विमिंग टॅंक, नदी, विहिरी, विशेषत: कालव्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. शहरात स्विमिंग टॅंक असतात मात्र, ग्रामीण भागात स्विमिंग टॅंक नसल्यामुळे मुले विहिरी किंवा नदीपात्रात पोहण्यासाठी जातात. वाई शहरातून गेलेल्या धोमच्या कालव्यावरही अशाप्रकारे शहरातील नागरिकांसह मुलांची पोहण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कालव्यात पोहण्यासाठी आलेल्या कितीतरी मुलांना पाण्याचा वेगवान प्रवाहामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्यामुळेही मुलांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. आजवर घडलेल्या या दुर्घटनांना आजही कुणी गांभीर्याने घेत नसल्याचे विदारक वास्तव आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने ना पालकांकडून खबरदारी घेतली जात आहे. ना प्रशासनाकडून मुळात या घटनांशी प्रशासनाचा काहीही संबंध नसला तरी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कालव्यांमध्ये पोहण्यासाठी मज्जाव करणे गरजेचे आहे, किंवा मुलांसोबत पालक असतील आणि विशेषत: पोहताना खरबादारी म्हणून त्यांच्याकडे ठोस उपाययोजना असतील तरच संबंधित मुलांना कालव्यात पोहण्याची परवानगी देण्याची नियमावली करणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)