पुसेगाव : गरजु विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना डॉ. सुरेशराव जाधव, मोहनराव जाधव, शिवाजीराव माने, जयंतराव जाधव. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

पुसेगाव, दि. 12 (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत हुशार, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन त्यांना सहाय्य करणाऱ्या सातारा मित्र मंडळ, सांगवी पिंपळे गुरव पुणे या मंडळाचे कार्य आदर्शवत आहे, असे गौरवोद्‌गार डॉ. सुरेश जाधव यांनी मांडले. पुसेगाव, (ता. खटाव) येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
सातारा मित्र मंडळ सांगवी पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी भविष्यात देखील गरजू व हुशार मुलांना मदत करण्याचे आश्वासन देत शाळेच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी श्री पोरे, संजय चव्हाण, प्रकाश पाटील, महेश भागवत, सोमनाथ कोरे, विश्वस्थ मोहनराव जाधव, संस्था सदस्य जयंतराव जाधव, प्राचार्य डी. पी. शिंदे, पर्यवेक्षक श्रीधर जाधव उपस्थित होते.प्राचार्य शिंदे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मोहन गुरव यांनी सूत्रसंचालन तर संजय जाधव यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)