सातारा: मायणीत हायहोल्टेजचा फटका

12 घरातील विद्युत उपकरणांसह संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक

मायणी – मायणी येथील इंदिरानगर(बेघरवस्ती) परिसरामध्ये बुधवारी सकाळी आठ वाजता अचानक झालेल्या हायहोल्टेज वीजपुरवठ्यामुळे येथील 12 घरांमधील विद्युत उपकरणांचे नुकसान झाले. यामध्ये 4 टीव्ही, 1 फ्रीज, 4 पंखे व 3 घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून खाक झाले असुन या कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार येथील इंदिरानगर (बेघर वस्ती) येथे असलेल्या इंदिरानगर वीजडिपीवरुन अचानक अतिउच्च दाबाने वीज पुरवठा झाला. या वस्तीत राहणाऱ्या शालन माने, मेहबुब नदाफ, शफीक बागवान, प्रकाश भिसे यांचे टीव्ही, राजेश खैरमोडे यांचे सेटअप बॉक्‍स, रवी भिसे, राजू कमाने, प्रशांत माने, दशरथ जाधव यांचे पंखे. सुनील बनसोडे यांचे होम थिएटर, प्रशांत माने यांचे फ्रीज, कुंडलिक जाधव यांचे सर्व बल्ब, राजू कमाने यांच्या व इतर ठिकाणावरिल सर्व लाइट फिटिंग अशा सर्व वस्तु जळुन खाक झाल्या आहेत.

अचानक झालेल्या या अतिउच्च दाब वीज पुरवठ्यामुळे येथील सुहास माने यांनी वीजवितरण कर्मचाऱ्यांना संपर्क साधला. यानंतर वीज वितरण कंपनीचे पेंदाम यांनी तपासणी केली असता वीज वाहक तारा एकमेकांना चिकटून अतिउच्च दाबाने वीज पुरवठा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रा. पं. सदस्य प्रतिनिधी महेश जाधव यांनी वीज वितरण अधिकारी ए.डी.लोखंडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
37 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)