सातारा: माणसे जोडणारा माणूस हरपला

खा. उदयनराजे : भय्यूजी महाराजांच्या आठवणींना दिला उजाळा

सातारा – शांती, संयमाचे मार्गदर्शन करणारे भय्यूजी महाराज यांच्या निधनाने माणसांना जोडणारा माणूस हरपला, अशा शब्दांत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सातारच्या राजघराण्याशी त्यांचे ऋणुानंबंध होते. साताऱ्यात भूमाता दिंडी होण्यापूर्वी भय्यूजी महाराज साताऱ्यात येवून गेले होते. त्यावेळी त्यांनी श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. त्यांच्या निधनानंतर खा. उदयनराजे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. भय्यूजी महाराजांकडून आपणास आशिर्वाद व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनामुळे माणसांना जोडणारा माणूस हरपला आहे. अध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांनी खूप मोठा भक्त समुदाय कमावला होता. त्यांचे आशिर्वाद सदैव आमच्यावर राहोत हीच प्रार्थना, असे खा. उदयनराजे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)