सातारा : मांढरदेव घाटात महिलेचा निर्घृण खून

वाई : मांढरदेव घाटाच्या मध्यावर असलेल्या मालवाठार नावाच्या शिवारात 24 वर्षीय अज्ञात महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. पांडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या कामगाराला उघड्यावर महिलेचे प्रेत पडल्याचे दिसले. दरम्यान, महिलेच्या शरिरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे.

वाई पोलिस स्टेशन व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पांडेवाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी कामगार गेला होता. त्याला त्या परिसरात उघड्यावरच महिलेचे प्रेत आढळुन आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क करुन पोलिसांनी माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून खातर जमा केली असता मालवाठार शिवारात महिलेचा धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित महिलेच्या अंगावर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस व त्यावर फुलाची नक्षी असलेली ओढणी व निळया कलरची सलवार आहे. तसेच हाताच्या मनगटावर मेहेन्दींने बानु-मोहंम्मद असे लिहिलेले आढळून आले. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, उपनिरीक्षक बी. बी. येडगे, हेडकॉन्स्टेबल त्रिंबक अहिरेकर, हवालदार के. डी. पवार, व महिला कर्मचाऱ्यासह सातारा एलसीबी पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक यांनी भेट देवून कसून तपास केला. अधिक तपास विनायक वेताळ व वाई पोलिस पथक करित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)