सातारा : महालक्ष्मी पतसंस्थेत ‘रस्ता सुरक्षा कार्यशाळा’ उत्साहात

सातारा – 29 वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2018 अंतर्गत सातारा जिल्हा आरएसपी शिक्षक तसेच आरटीओचे अधिकारी यांच्यासह सातारा जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्यामार्फत महालक्ष्मी पतसंस्थेच्या महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, मोळाचा ओढा, शाहूपुरी, सातारा येथे बुधवार, दि. 25 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत कार्यशाळा संपन्न झाली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाहूपुरी पोलीस स्टेशनचे प्रमुख किशोर धुमाळ यांनी आपल्या मनोगतात ही कार्यशाळा साताऱ्यातील पुढच्या तरुण पिढीसाठी अत्यंत उपयुक्‍त असून विद्यार्थी दशेतच वाहतुकीचे नियम त्यांना समजले तर त्यांच्यामध्ये प्रगल्भता येवून लायसन्स घेतानाच त्यांना लायसन्सचे महत्व समजेल असे सांगितले. यावेळी संजय धायगुडे यांनीही मनोगत व्यक्‍त केले.

आरएसपीचे सातारा जिल्हा प्रमुख श्रीनिवास वाळवेकर यांनी प्रास्तविक केले. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे प्रमुख शिरीष चिटणीस यांनी सर्वांचे स्वागत केले. आरएसपीचे शिवाजी सूर्यवंशी यांनी आभार मानले. याप्रसंगी खोत मॅडम, आरएसपीचे अधिकारी अहिरेकर, जगदाळे, बेस्के, गायकवाड यांनी मनोगते व्यक्‍त केली. महालक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनील गोरे, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले आणि इतर याप्रसंगी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)