सातारा : मराठा, धगनर, मुस्लिम आरक्षणासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक

z P

 

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणच्या मुद्द्यावर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाबाहेरच घोषणाबाजीला सुरवात केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या आंदोलनानंतर सर्व सदस्य सभागृहात आले. त्यानंतर सभेला प्रारंभ झाला. अशी घटना जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा पहावयास मिळाली. तसेच जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, विरोधक सर्व सदस्य एकत्र येऊन हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची चर्चा जिल्हा परिषदेत चांगलीच रंगली आहे.

सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहाबाहेर येऊन निदर्शने केली. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी जिल्हा परिषदेचा चौथा मजला दणाणून सोडला.

जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी  सर्वसाधारण सभेत आरक्षण संदर्भात ठराव घेऊ असे आश्वासन दिले त्यानंतर सदस्य शांत झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)