सातारा : मटका अड्ड्यावर पैसे मागणारे हंकारे निलंबित

दै. प्रभातच्या बातमीचा परिणाम ; जिल्हा पोलिस प्रमुखांचे आदेश

 

-Ads-

सातार्‍यातील राजवाडा परिसरात मटका अड्ड्यावर पैसे मागणारे पोलिस नाईक धोंडीराम हंकारे यांना अखेर जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी निलंबित केले.

याप्रकरणाचा व्हिडीअो एका नागरिकाने सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यानंतर दै. प्रभातने सलग दोन दिवस वृत्त प्रसिध्द केले होते.

मंगळवारी प्रभातने “हंकारेंना आवरा पोलिसांची इज्जत सावरा” या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते.

या वृत्ताची दखल घेत व त्या व्हिडिओची पडताळणी करुन शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पो.ना. धोंडीराम हंकारे यांना सेवेतुन निलंबित केल्याचा आदेश जिल्हा पोलिस प्रमुखांनी मंगळवारी दिला आहे.

हंकारे यांची व्हायरल झालेली ती क्लिप व  दै. प्रभातने केलेले  वृत्तांकन यामुळेच हंकारे यांना निलंबित केल्याची चर्चा पोलिस दलात सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
6 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)