सातारा: भणगे खून प्रकरणी आणखी 2 अटकेत

सातारा – दाखल असलेली केस मागे घेण्याच्या कारणावरुन सातारा शहरातील मंगळवार तळे येथे संदीप भणगे या युवकाचा खून करण्यात आला होता.याप्रकरणी सोमवारी पहाटे आणखी दोघांना अटक झाल्याने आरोपींची संख्या तीनवर गेली आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयीत प्रसाद कुलकर्णी व त्याच्या काही साथीदारांवर मयत संदीप याने मारहाणीचा व दरोड्याचा गुन्हा सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केला होता.त्यानंतर तब्बल 23 दिवसांनी शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे प्रशांत धाबेकर रा. शाहूपुरी व प्रथमेश कुलकर्णी रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 मे पयत पोलिस कोठडी सुनावली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)