सातारा : ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे मजबूतीकरण प्रगतीपथावर

वाहतूक ठप्प


दुचाकी वाहतुकीसाठी जुलैची डेडलाईन तर वर्षभरात हलक्‍या चारचाकी वाहनांसाठीही होणार खुला

कऱ्हाड :  येथील ऐतिहासिक ब्रिटीशकालीन राजवटीचा साक्षीदार असलेल्या जुन्या कोयना पुलाच्या मजबूतीकरणाचे हाती घेण्यात आलेले काम सध्या प्रगतीपथावर असून पुलाच्या कामासाठी बांधकाम विभागाला 30 जुन पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यासाठी पुलावरून सध्या चालू असलेली दुचाकी वाहनांच्या वर्दळीमुळे कामात अडथळा निर्माण होत असल्या कारणाने कामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 30 जून पर्यंत या पुलावरील वाहतुक पुर्णपणे ठप्प करण्यात आली आहे.

जुन्या कोयना पुलाच्या दुरूस्तीसाठी पावसाळ्यात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवत बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी या पुलाच्या आवश्‍यक भागाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या कामासाठी बांधकाम विभागाला 30 जुन पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरून सध्या चालू असलेल्या दुचाकी वाहनांच्या रहदारीमुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा पुल 30 जुन पर्यंत वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात आला असून सध्या या पुलावरील पुर्वीच्या डांबरीकरणाचा थर जेसीबीच्या साह्याने काढून पुलावरील बोजा कमी करण्यात येत आहे.

तसेच नदीपात्रातील पाणी एका बाजूला वळवून पुलाच्या खांबांच्या दरजा भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढविण्यात आला आहे. पुलाचे काम पुर्ण झाल्यानंतर जुलैपासून हा पुल नव्याने कऱ्हाडकरांच्या सेवेत रुजू होणार असून हलक्‍या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी मात्र पुलाचे काम पुर्ण होण्याची वाट पहावी लागणार आहे. त्यासाठी कऱ्हाडकरांना आणखी वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हा ब्रिटीशकालीन पूल गेल्या शंभर वर्षापासून कोयना नदीवर डौलात उभा असून या पुलाचे वाहतुक वाहून नेण्याचे आयुर्मान संपले असल्याचे इंग्लंड सरकारने पत्रव्यवहाराव्दारे संबंधित विभागाला या पुलावरील संपूर्ण वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी या अर्थाचे पत्र पाठविले होते. तेव्हापासून काही काळ जुन्या पुलावरील पूर्ण वाहतुक बंद करण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विभागाकडून पुलाच्या दोन्ही बाजूला लोंखडी खांब रोवण्यात आले होते.

मात्र, काही कालावधीनंतर हा पुल फक्त दुचाकी वाहनांच्या वाहतूकसाठी खुला करण्यात आला होता. त्यानुसार सध्या या पुलावरुन केवळ दुचाकींची वाहतुक सुरु होती. परंतु, हा पूल वाहतुकीस बंद केल्यापासून कोल्हापूर नाक्‍यावरील वाहतुक कोंडी मध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जुन्या कोयना पुलाची दुरूस्ती करून तो पूल वाहतुकीस खुला करण्यात यावा अशी कराड व परिसरातील लोकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कराड शहरातील विविध विकासकामांबरोबरच लोकांच्या मागणीचा विचार करून या पुलाच्या दुरूस्तीस मान्यता दिली होती. मात्र, नंतर सत्तांतर झाल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले नव्हते.

त्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठपुरावा सुरु होता. दरम्यानच्या काळात या पुलाच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला असल्याने नुकतेच बांधकाम विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार या पुलाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये दाखवलेले पुलातील दोष व दुरुस्त्या करण्यासाठी व पुलाचे मजबुतीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती.

पुलाच्या मजबूतीकरणाचे कामामुळे जुक्‌या कोयना पुलावरील पादचारी व दुचाकी 25 मार्चपासुन 30 जुनपर्यंत बंद करण्यात येणार आली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पुणे-बेंगळुरु महामार्गावरील नवीन कोयना पुलाचा कराड शहरात येण्यासाठी वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प उपविभागामार्फत करण्यात आले आहे.

दगड आणि लाल मातीपासून कोयना पुलाची निर्मिती
कराड येथील कोयना नदीवर गेल्या शंभर पेक्षा जास्त वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पुलाचे बांधकाम हे त्याकाळी फक्त दगड आणि लाल मातीपासून करण्यात आले असून इंग्लंड सरकारने संबंधित विभागाला सदर पुलाचे वाहतुक वाहून नेण्याचे आयुर्मान संपले असल्याचे पत्र पाठविले असले तरीही ते आजमितीसही अगदी भक्कम आहे.

लाल चिकन माती आणि काळ्या दगडांची आडत करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ऐतिहासिक ब्रिटीशकालीन जुना कोयना पुल हा उत्कृष्ट स्थापण्याचा नमूना आहे. दुसरीकडे मात्र सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात येणाऱ्या पुलांपैकी काही पुल उद्घाटना अगोदरच कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या जुनी स्थापत्य कलाच श्रेष्ठ ठरल्याचे अनेकदा दिसून येते.

मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना येथील ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पुलाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या कामासाठी शासनाकडून सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या पुलाच्या मजबुतीकरण सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा मंजूर करण्यात आला.

मात्र त्यानंतर झालेल्या सत्ताबदलामुळे राज्य शासनाकडून त्यातील बर्याच विकासकामांचा निधी गोठवण्यात आला होता. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी या कामासाठीच्या निवडीबाबत सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याने शासनाने येथील जुन्या कोयना पुलासाठी 4 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)