सातारा: बोगसप्रकरणे करून शेतकऱ्यांची 22 लाखांची फसवणूक

कुडाळ – कुडाळ, ता. जावली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखाप्रमुख आणि शिपायाने संगनमत करून सात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून 22 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी शिपाई व एका एजंटास अटक केली आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

याबाबत माहिती अशी, करंदी तर्फ कुडाळ ता. जावली येथील नवनाथ तानाजी निकम व त्यांचे वडील तानाजी यशवंत निकम यांच्या नावावर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत पिक कर्ज काढून देतो असे सांगून, त्यांच्या जमिनीचे उतारे व इतर कागदपत्रे घेऊन बॅंकेचा शाखा प्रमुख मनोज लोखंडे व शिपाई गाढवे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या अज्ञानाचा व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्जप्रकरणावर सह्या घेवून निकम पिता-पुत्रांची तीन लाखांची फसवणूक केली आहे. याशिवय लोखंडे व गाढवे यांनी शिवाजी वामन वेदपाठक रा. करंदी, तानाजी महादेव निकम रा. करंदी, प्रकाश लक्ष्मण गावडे रा. आखेगणी, आनंद तुकाराम गंगावणे रा. राणगेघर, जयश्री दत्तू पवार रा, दरे बुद्रुक या शेतकऱ्यांच्या नावावरही कागदपत्रांचा बोगस कर्जप्रकरण करून 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद झाला असून संशयित मनोज लोखंडे अद्याप फरार आहे तर शिपाई गाढवे आणि मंगेश निकम या एजंटास पोलिसांनी अटक केली आहे.

लखोबा लोखंडेची चलाखी
मनोज लोखंडे याने मोठ्या चलाखीने कागदोपत्री कुठं ही अडचणीत येणार नसल्याची काळजी घेतली असली तरी शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणे व एजंटच्या या प्रकरणातील सहभाग खात्यावर जमा होणारी रकमेची अफरातफर यामध्ये भानगडी झाल्याचे स्पष्अ होत आहे. त्यामुळे तो मी नव्हेच म्हणणार लखोबा लोखंडे मेढा पोलिसांच्या ताब्यात कधी येणार असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)