नागठाणे – शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी सुरू असलेली बीयर विक्रीची अनेक दुकाने ही केवळ दुकानेच राहिली नसून त्याचे रूपांतर आता चक्क छोटेखानी बीयर बारमध्ये झाले आहे. दुकानातच बेकायदा बियर पिण्याची व्यवस्था दुकानमालकांनी केली तरी संबंधित उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

केवळ बीअर विक्री दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी बीअर विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागात बीअर विक्रीची दुकाने सुरू आहेत. या दुकानांमधून केवळ बीयर विक्रीलाच परवानगी आहे, परंतु अनेक दुकानांमधून दुकानातच बीयर पिण्याचीही व्यवस्था दुकानमालकांनी केली आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने बीयरला मद्यप्रेमींकडून जोरदार मागणी आहे. याचा फायदा विक्री करणाऱ्यांनी घेतला आहे.

काही दुकानदारांनी आपल्या दुकानाचा पुढचा भाग बंदिस्त करून त्यात ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या आतल्या बाजूलाच ही सर्व व्यवस्था केली आहे, तर काहींनी चक्क दुकानाच्या बाजूलाच आणखी एक व्यावसायिक गाळा घेतला असून त्यात बीअर बार सुरू केला असून ग्राहकांना चखणाही उपलब्ध करून दिला जात आहे. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)