सातारा : बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

 

वाई मांढरदेव पठारावरील वेरुळी (सोमेश्वरवाडी) येथील घटना

वाई मांढरदेव पठारावरील वेरुळी (सोमेश्वरवाडी) येथील शेतकऱ्याच्या बंदिस्त शेडमधील तीन शेळ्यांचा बिबट्याने रात्रींच्यावेळी फडशा पाडल्याने वेरुळी परिसरातील शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे.

वेरुळी(सोमेश्वरवाडी) येथील शेतकरी प्रमोद विठ्ठल जाधव यांचे राहत्या घरा शेजारीच शेळ्यांचे बंदिस्त शेड असून रात्रीच्या वेळी बिबट्याने बंद शेडच्या भिंतीवर चढून छोटयाशा मोकळ्या जागेतून शेडमधील तीन शेळ्यांचा खात्मा केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.

घटनेची माहिती परिसरात बिबट्याची दहशती पसरली आहे . दरम्यान वनक्षेत्रपाल महेश झाजुणें वनपाल सदानंद राजापुरे, वनरक्षक वैभव शिंदे,वसंत गवारी यांनी घटनास्थळाला भेट दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)