सातारा : बाळ्या जाधवच्या टोळीला मोक्का

औंध येथे प्रवाशांची केली होती लुट; माण तालुक्‍यातील दोन तर खटावच्या एकाचा समावेश

खटाव माण तालुक्‍यात प्रवाशांना अडवुन लुटणाऱ्या बाळ्या जाधवच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बाळ्या जाधव व त्याची टोळी प्रवाशांना अडवुन लुटत होती.

त्यांच्या लुटमारीच्या सत्रामुळे या दोन तालुक्‍यात दहशत पसरली होती. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी कडक कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.त्यानुसार बाळु गिरजाप्पा जाधव, विशाल अशोक मदने ( दोघे रा. महिमानगड, ता, माण) विशाल कैलास पाटोळे रा. औंध ता. खटाव अटक करून मोक्काचा प्रस्ताव पाठवला होता. बाळ्या जाधव टोळीच्या मोक्‍क्‍यानंतर आता भुरटे चोर पोलिसांच्या रडारवर आहेत.

मे महिन्यात या टोळीने औंध येथे देवदर्शन करून मारूती मंदिराजवळील पायरीवर बसलेल्या एका युवकाला व त्याच्या सोबत असलेल्या महिलेला नाव, गाव विचारले होते. त्यानंतर त्यांच्याकडे असलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी व आरोपी यांच्यात झटापट झाली होती.

दरम्यान यातील आरोपींनी फिर्यादीला व त्याच्यासोबत असलेल्या महिलेला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली होती. लाकडी दांडक्‍याने झालेल्या मारहाणीत फिर्यादीच्या पायाला जखम झाली होती. जखमी फिर्यादी व सोबत असलेल्या महिलेला जिवे मारण्याची धमकी देत आरोपींनी रोख रक्कम 5 हजार व 14 हजार रुपये किमंतीचा मोबाईल चोरला होता. या चोरीची तक्रार फिर्यादी यांनी औंध पोलिस ठाण्यात दिली होती.

त्यानुसार औंधचे स.पो.नि. सुनिल जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तपास करत आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या होत्या. बाळु गिरजाप्पा जाधव, विशाल अशोक मदने ( दोघे रा. महिमानगड, ता, माण) विशाल कैलास पाटोळे रा. औंध ता. खटाव यांना अटक करून त्यांच्या विरोधात मोक्का कायद्याने कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे पाठवला होता.

आरोपींच्या गुन्ह्यांची मालिका अन लोकांच्यात निर्माण झालेले भितीचे वातावरण पाहता जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. पोलिस महानिरीक्षकांनी प्रस्वाला मंजुरी दिल्याने बाळु जाधव टोळीचा मुक्काम आता कारागृहातच असणार आहे. मोक्‍क्‍याचा पुढील तपास दहिवडी उपविभागाचे पोलिस उपअधिक्षक करत आहेत.

सावकारानंतर आता चोरटे
जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील खासगी सावकारांचे कंबरडे मोडत जिल्हा जवळजवळ सावकारीमुक्त केला आहे. त्यानंतर त्यांनी आता लोकांच्यात भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्या भुरट्या चोरांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सावकारानंतर आता मिशन चोरटे राबवले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
75 :thumbsup:
43 :heart:
1 :joy:
4 :heart_eyes:
5 :blush:
3 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)