सातारा: बस स्थानकातुन पर्स चोरी,युवतीला अटक

सातारा -सातारा बसस्थानकातुन युवतीची पर्स चोरट्याने चोरून नेहली आहे.अक्षदा सुर्यकांत जाधव (वय19) रा.देसाई कॉलनी,सदर बझार सातारा हि मंगळवारी चार वाजता बसस्थानकावरील आसनगाव कुमठे जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना अज्ञात चोरट्याने रोख रक्कम चारशे रुपये असलेली पर्स चोरून नेहल्याची तक्रार सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.बसस्थानकातील सी.सी.टिव्हीच्या फुटेजच्या आधारे बसस्थानक पोलिस चौकीतील पो.हवा.प्रवीण पवार,दत्ता पवार,अरूण दगडे,केतन शिंदे यांनी दिक्षा विजय भोसले वय 19 रा.गोवे,ता.सातारा हिला ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिल्याने तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)