गजबजलेल्या बसस्थानकात मद्यपींचा खेळ, महिला प्रवाशांची होतेय कुचंबणा
सातारा : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान अथवा धूम्रपान करू नये असा कायदा असताना सुद्धा सातारा मध्यवर्ती बसस्थानकात मद्यपींचा अड्डा बनला आहे. बाहेर इतरत्र कुठेही दारू प्यायची आणि आसरा मात्र बसस्थानकाचा घ्यायचा असा फंडाच मद्यपींनी अवलंबला आहे.
सातारा मध्यवर्ती बस स्थानक हे पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे बसस्थानक असल्याने ते नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक युवक युवती तसेच नोकरदार लोकांची नेहमीच या बसस्थानकात ये-जा असते. यापूर्वी अनेकदा बसस्थानकाबाहेर असलेल्या मद्यपी ,टपोरी लोकांच्या खोडसाळपणामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या होत्या. आत्ता मात्र सातारा बसस्थानकात दारु पिलेले लोक वेगवेगळ्या फलाटावार पडलेले असल्याने बस फलाटावर लावताना चालकांची तर बसकडे जाताना प्रवाशांना विशेषत: महिलांची कुचंबणा होताना दिसते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा