सातारा बसस्थानकातून दागिने लांबवले

सातारा- सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये एसटीत बसत असताना गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञाताने साडेपाच तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लांबवला. चोरीची घटना समोर आल्यानंतर महिलेने आरडाओरडा केला. मात्र चोरटे पसार झाले.

जयश्री विकास शिवणकर (वय 40, रा.संगमनगर, सातारा) यांनी याबाबतची शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि. 12 रोजी सायंकाळी 5 वाजता तक्रारदार जयश्री शिवणकर या वेणेगावला जाण्यासाठी बसस्थानकात थांबल्या होत्या. सातारा- पाटण एसटी आल्यानंतर तिथे प्रवाशांची गर्दी झाली.

याच गर्दीचा गैरफायदा घेवून अज्ञात चोरट्याने तक्रारदार यांच्या पर्समधील दोन तोळ्याचे गंठण, सव्वा तोळ्याचे नेकलेस, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्ध्या तोळ्याची वेल, सोन्याची नथ व 4 हजार रुपये रोकड असा एक लाखाचा ऐवज लांबवला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही तपासले असता एक एसटी आडवी येत असल्याने चोरटा दिसू शकत नाही. यापेकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.ना. अरूण दगडे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)