सातारा : बलात्कार व गर्भपात प्रकरणी युवकास सात वर्षाची शिक्षा

मदत करणाऱ्या आईलाही 3 वर्षाची शिक्षा

सातारा : वाई तालुक्‍यातील पिराचीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर दोनवेळा बलात्कार करुन तिला गर्भवती करणाऱ्या एका तरुणाला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रशांत एकनाथ घोरपडे (वय 31) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणात आपल्या मुलाची चूक पोटात घालण्यासाठी पीडित मुलीचा गर्भपात करणाऱ्या आईलाही जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

पीडित मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी आरोपीची आई शोभा एकनाथ घोरपडे ( वय 52) यांना 3 वर्षाची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 7 पी. व्ही. घुले यांनी ही शिक्षा सुनावली. पीडितेला 5 लाख रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

-Ads-

याबाबत अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर 19 आणि 25 जून 2011 या दिवशी प्रशांत घोरपडे याने बलात्कार केला होता. याबाबतची गाजावाजा केल्यास लहान भावाला जीवे मारण्याची धमकी संबंधीत मुलीला देण्यात आली होती. पाच महिन्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलासह तिच्या कुटुंबाकडे जाब विचारल्यानंतर प्रशांतनेही कबुली दिली. मुलीशी लग्न करतो आता तो गर्भपात करा असे लेखीटाकी केले. गर्भवती मुलीचा गर्भपात केल्यानंतर मात्र मुलाने नंतर विवाहासाठी नकार दिला.

अखेर त्यानंतर 23 डिसेंबर 2011 रोजी वाई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने वकील मंजुषा तळवलकर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)