सातारा : बरडमध्ये पाच जणांवर काळाचा घाला 

फलटण : पुणे पंढरपूर महामार्गावर बरड गावच्या हद्दीत भरधाव वेगात निघालेली कार झाडास धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन लहान मुलांसह पाचजण जागीच ठार झाले असून चारजण जखमी झालेले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

सोलापूरहून पुणेच्या दिशेने चाललेली असेंट कार (क्र. एमएच 14 बीसी-9480) ही चारचाकी आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान बरड गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर चालकाचा गाडीवरुन ताबा सुटून ती कार रस्त्यालगत असणाऱ्या झाडाला जोरदार धडकली. या गाडीमध्ये सुमारे 9 प्रवासी प्रवास करीत होते. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते. या अपघातामध्ये एक नऊ वर्षाची मुलगी, 7 ते 8 वर्षे वयाचा मुलगा व चालक असणारा 23 वर्षाचा युवक जागीच ठार झाले आहेत. (मृतांची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही) तर गाडीतील इतर चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. पाचजणांची बसण्याची क्षमता असलेल्या या गाडीमध्ये सुमारे नऊजण दाटीवाटीने बसविले असल्यामुळे हा अपघात झाला असण्याबाबतची शक्‍यता नाकारता येत नाही. अपघातस्थळी रक्ताचा अक्षरश: सडा पडलेला होता. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)