सातारा: बघ्याची भूमिका घेणार नाही : ना. पाटील

कोल्हापूर, (प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा तोफ डागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दराबाबत साखरपट्ट्यात सुरू असणाऱ्या आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन शांततेत करण्याचं आवाहन केलं आहे. हिंसक आंदोलन केलं तर प्रशासन बघ्याची भूमिका घेणार नाही असा इशारा ही महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

संबंधित बातम्या

सातारा : ऊसदर आंदोलन पेटले

चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे खोटं बोलत आहेत आणि तेही रेटून बोलतात, त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करणं सोडावे असा सल्ला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेला आहे. राजू शेट्टी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी हिंसक आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन करून दाखवावे, कारण शेतकरी आंदोलन हे केवळ पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन केले जात असून मूळ शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्यांना घालण्यासाठी तयार झालेला आहे.

शेतकऱ्यांना शांत बसण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं तर त्यांना कळेल कि किती शेतकरी त्यांच्या बाजूने आहेत. राजू शेट्टी यांना केवळ लोकसभेची निवडणूक कोल्हापुरातून लढवायची आहे. म्हणूनच ऊस आंदोलन केवळ कोल्हापूर पुरता मर्यादित असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)