सातारा: बंदी नंतर ही साताऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर

सातारा- सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर अनेक वेळा बंदी घालून देखील अद्याप पिशव्यांचा साताऱ्यात सर्रास वापर होताना दिसून येत आहे. शहरातील कापड दुकानांसह मिठाई, हॉटेल तसेच हातगाड्यावर विक्री करणारे गिऱ्हाईकांना प्लास्टिक पिशवीतून वस्तू देत आहेत. त्याच बरोबर प्लास्टीकच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लास यांचा ही वापर अद्याप थांबलेला नसून समारंभामध्ये त्याच वस्तूंचा वापर होत आहे. तसेच शुध्द पाण्याची देखील अद्याप प्लास्टिक बाटलीव्दारे विक्री होत असून सरकारने जरी पर्यावरण संतुलनासासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असला तरी कारवाईचे अधिकार दिलेल्या नगरपालिका अधिकाऱ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचे साठे करणारे व विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी पर्यावरणाचा अधिक ऱ्हास होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)