सातारा: फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक सर्व्हेला सज्ज राहावे

पाचगणी -केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत पाचगणी शहर व परिसरातील स्थिर व फिरत्या स्टॉलधारकांना पाचगणी ओळखपत्र व परवानापत्र दिले जाणार आहे. त्यासाठी सर्व फेरीवाल्यांचा पाचगणी नगरपरिषदेच्यावतीने बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात येणार असून त्यासाठी सर्व स्टॉलधारकांनी या होणाऱ्या मोबाईल ऍपच्या सर्वेसाठी सज्ज राहावे असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेच्यावतीने मुख्याधिकारी अमिता दगडे – पाटील यांनी केले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व फेरीवाले व स्टॉलधारकांची मिटिंग पालिकेच्या सभागृहात घेण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा फेरीवाला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण निकम, उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामणे, नगरसेवक विनोद बिरामणे, प्रवीण बोधे, पृथ्वीराज कासुर्डे, अनिल वंने, विजय कांबळे, नगरसेविका उज्ज्वला महाडिक, रेखा कांबळे, सुलभा लोखंडे, अपर्णा कासुर्डे, नीता कासुर्डे, रेखा जानकर, आशा बगाडे, सुमन गोळे व फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बायोमेट्रिक सर्वेसाठी स्टॉलधारकांनी आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक करून घेणे आवश्‍यक आहे. तसेच रेशन कार्ड, आधारकार्ड, दोन फोटो, मतदान ओळखपत्र, डोमसाईल सॅर्टिफिकेट आदी कागदपत्रांसह सज्ज रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामने म्हणाले की, शहरातील सर्व स्टॉलधारकांचा सर्व्हे करताना कोणताही स्टॉलधारक वंचित राहणार नाही, यासाठी सर्व्हे अगोदर सर्वांना सूचित केले जाणार आहे. तसेच आपणही आपल्या शेजारील स्टॉलधारक व फेरीवाल्यांस याची कल्पना द्यावी असे सांगितले.
यावेळी फेरीवाला हॉकर्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण निकम यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या फेरीवाला धोरणाच्या आदेशाचे पालन करीत ओळखपत्र व परवानापत्र देण्याच्या बायोमेट्रिक सर्व्हेस सर्व नगरपालिकांनी सहकार्य करावे. तसेच सदरच्या सर्व्हेत फेरीवाल्यांना आधारकार्ड असताना डोमासाईल सर्टिफिकेटची सक्ती करण्यात येऊ नये अशी विनंतीवजा मागणी त्यांनी केली. या मिटिंगसाठी शहारातील बहुसंख्य स्टॉलधारक व फेरीवाले उपस्थित होते. आभार प्रकल्प अधिकारी माधवी जगदाळे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)