सातारा :फायरिंगच्या अफवेने पोलिसांची पळापळ

रविवारी सायंकाळी 7 च्या सुमारास कास परिसरात एका वाहनधारकाने त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरमधून फायरिंग केल्याची माहिती पोलिसांना दुरध्वनीवरून मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी तातडीने बोगदा परिसरात धाव घेत नाकाबंदी केली मात्र, फायरिंगची केवळ अफवाच असल्याचे तपासानंतर निदर्शनास आले.
रविवारी बोगदा परिसरात वाहनधारकांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरून एका वाहनधारकाने समोरील वाहन धारकाचा गाडी नंबर पोलिसांना देत त्याने कास परिसरात त्याच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरमधून फायरिंग केल्याची माहिती दिली होती.
त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी तातडीने धाव घेत अधिक माहिती घेतली असता दोन वाहनधारकांच्या वादातून खोडसाळपणे खोटी माहिती दिल्याचे त्यांच्या लक्षात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी दिली.

दरम्यान, पोलिस गाड्या बोगदा परिसरात जावू लागल्याने आणि फायरिंगच्या अफवेमुळे बोगदा परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी कोणताही गोळीबार झाला नसल्याची खातरजमा केल्यानंतर सर्वांनी सुस्कारा सोडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
3 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)