सातारा: फायरमन पदासाठी लेखी परीक्षा

सातारा – सातारा पालिका व अग्निशमन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहा फायरमन पदासाठी होणारी लेखी परीक्षा येत्या बावीस तारखेला कोटेश्वर मैदान येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार शेंदूरे येथील हायस्कुलमध्ये होत आहे . फायरमन पदासाठी झालेल्या शासकीय हालचालींमुळे या भरतीला तब्बल चार वर्षांनी मुहूर्त लागला आहे . या पदासाठी पात्र चाळीस उमेदवारांना पाचारण करण्यात आले आहे . या भरतीमुळे सातारा शहराला लवकरच प्रशिक्षित फायरमन मिळणार आहेत.

अग्निशमन संचालनालयाने सातारा शहरासाठी राजवाडा व दगडी शाळा सदरबझार येथे अद्ययावत अग्निशमन केंद्राची मंजूरी दिली. आस्थापनेवर एकूण 40 जणांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार होते. मात्र इतक्‍या यंत्रणेचा खर्च पेलणार नसल्याने केवळ सहा पदांना पहिल्या टप्प्यात मंजूरी देण्यात आली . सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ पध्दतीने घेण्यात येणार असून अग्निशमन संचालनालय यंत्रणेचे दोन वरिष्ठ अधिकारी साताऱ्यात दाखल होणार आहे . लेखी परीक्षेसह उमेदवारांची शारीरिक चाचणी सुद्धा त्याच दिवशी घेण्याच्या प्रयत्नात नगर पालिका आहे . त्याकरिता पोलीस कवायत मैदान उपलब्ध व्हावे याकरिता पालिकेकडून पाठपुरावा सुरु आहे. सातारा शहराची अग्निशमन यंत्रणा शहरासह संपूर्ण तालुक्‍यात पुरवली जाते. मात्र इतके दिवस पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून च कामचलाऊ पद्धतीने आग विझवण्याचे काम होत होते. या कामासाठी सहा फायर फायटर सातारा शहरांसाठी प्रथमच उपलब्ध होत आहे . मात्र चार वर्षापूर्वी प्रस्ताव पाठवलेल्या भरती मोहिमेची प्रक्रिया इतकी का रखडावी या विषयावर मात्र आश्‍चर्य व्यक त होत आहे .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)