सातारा: फायरमन पदाच्या भरतीत “महाघोटाळा’

अमोल मोहिते यांचा आरोप:चौकशी समिती नेमण्याची मागणी

सातारा पालिकेच्या सभेतएकूण 11 विषयांना मंजुरी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सभागृहात पालिका प्रश्‍नावरचचर्चा करण्याची मागणी

सातारा -सातारा पालिकेने अग्निशामक दलातील फायरमेनच्या 5 जागांसाठी 22 एप्रिल 2018 मध्ये परिक्षा घेण्यात आली होती. सुमारे 38 जणांनी या पदासाठी परीक्षा दिली. यापैकी दोन जणांना 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत. हे अगदी वास्तव आहे. या भरतीमध्ये मोठा अर्थिक घोटाळा झाला आहे. यासाठी चौकशी समिती नेमावी अशी मागणी विरोधी नगरसेवक अमोल मोहिते यांनी केली. दरम्यान पालिका सभागृहात बोलताना नगरसेवकांनी पालिका प्रश्नावरच चर्चा करावी. नेत्यांची नावे घेवून खालच्या पातळीवर जावून त्यांच्यावर टिका करण्यात इतपत आपण नगरसेवक मोठे नाही. याचे भान ठेवून यापुढे सत्ताधारी नगरसेवकांनी वक्तव्य करावीत. अन्यथा आम्हालाही त्याच भाषेत टिका करावी लागेल असा सबुरीचा सल्लाही मोहिते यांनी यावेळी बोलताना दिला.

सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा छ. शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सभेत कोणतीही वादग्रस्त चर्चा न होता विषय पत्रिकेवरील एकूण 11 विषयांना मंजूरी देण्यात आली. काही विषयांना विरोधकांनी उपसुचना देवून विरोध केला होता मात्र सत्ताधाऱ्यांनी विनवणी केल्यानंतर त्या विषयांना एकमतांनी मंजूरी देण्यात आली.

सभेच्या प्रारंभी विरोधी नगरसेवक अमोल मोहिते सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले त्यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी विषय सोडून कोणीही चर्चा करू नये, मी बोलण्यास परवानगी देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यावर अमोल मोहिते म्हणाले, आम्ही विषय सोडून बोलतच नाही. मात्र गेल्या आठ दिवसांपुर्वी झालेल्या सभेत आमच्या नेत्यांवर जी खालच्या पातळीवर जावून सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक वसंत लेवेंनी टिका केली. याठिकाणी मी एवढेच सांगतो की, नेत्यांवर बोलण्याइतपत सभागृहातील नगरसेवक त्याच्यापेक्षा मोठा नाही. सातारा विकास आघाडीतील ज्येष्ठ नगरसेवकांनी तुमच्या नगरसेवकांना तुम्ही समज द्यावी. अन्यथा आम्हाला बरेच काही बोलता येईल. असे सांगून मोहिते म्हणाले, सातारा पालिकेने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदविला होता. पालिकेचा राज्यात 11 वा तर देशात 57 वा नंबर आला. गेल्या आरोग्य सभापतींच्या कामकाजापेक्षा विद्यमान सभापतींनी काम चांगले केल्यामुळे गतवर्षी देशात सातारा पालिकेचा 157 वा नंबर होता तो आज 57 आला आहे. ही बाब अभिमानास्पद आहे, असा टोला कुणाचेही नाव घेता लगावला.

स्वच्छतेच्या नावाखाली पालिकेले 1 कोटी रूपयांचा चुराडा केला आहे. 1 कोटी रूपये खर्च केले त्या तुलनेत शहरातील आरोग्यात सुधारणा झालेली दिसत नाही. रस्त्यावर आजही कचरा पडलेला दिसतो. रंगरंगोटीवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी ग्राऊंड लेवलला जावून काम केले असते सातारा पालिका राज्यात पहिल्या दहा मध्ये तर देशात पहिल्या 50 मध्ये आली असती. पालिकेला 5 कोटीचे बक्षिसही मिळाले असते. स्वच्छतेवर एवढा खर्च झाला असताना पालिका कुठे कमी पडली. याचा खुलास मुख्याधिकाऱ्यांनी करावा असे मोहिते यांनी सांगीतले.

मोहिते यानी केलेल्या आरोपांवर खुलास करताना मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, नव्या धोरणानुसार आता मुख्याधिकाऱ्यांनाही मत मांडण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. 2014 ला देशभर स्वच्छ भारत अभियानास प्रारंभ झाला. सलग तीन वर्षे आपण कुठे कमी पडत आहे, याचे अवलोकन केले. अमृत योजनेसाठी देशातील 534 शहरांची निवड करण्यात आली होती, त्यात सातारा शहराची निवड झाली. अमृत योजनेत सहभागी झालेल्या सर्वच शहरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. सातारा पालिकेने स्वच्छतेवर 1 कोटी रूपये खर्च केले नाहीत. खर्चाची आकडेवारी कमी आहे. अद्यापही स्वच्छ अभियानातील बीले कोणालाही देण्यात आलेली नाहीत. स्वच्छ अभियांनाची परीक्षा ही 4 हजार मार्काची होती. त्या परीक्षेत सातारा पालिकेला 2815 गुण मिळाले. पालिकेकडे घनकचरा प्रकल्प, भुयारी गटार योजना, शौचालय मैला विल्हेंवाट लावण्याचे प्रकल्प नसल्याने कमी गुण मिळाले अशी कबुली मुख्याधिकारी गोरे यांनी सभागृहात दिली.

यानंतर विषय पत्रिकेवरील पालिकेच्या मालकिच्या खुल्या जागा भाडे कराराने देण्यात आल्या होत्या. त्यांच्या मुदती संपल्या आहेत. त्यांचे ताब्यातील मालमत्तेचे फेर लिलाव नव्याने करार करून भाडे आकारणी करण्याचा विषय चर्चेला आला होता. यावर विरोधकांनी हा विषय तहकुब करावा अशी उपसुचना दिली होती. मात्र सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला मान देवून विरोधकांनी या विषयाला एकमतांनी मंजरी दिली. यानंतर प्रभाग 15 मधील माची पेठ लांडगे घर ते केरेकर घर व ढोल्या गणपती कॉर्नर ते शेख घर अंतर्गत ठिकाणी रिटेंनिंग वॉल बांधणे, पाईपड्रेन करणे, कॉंक्रीट करणे या कामाच्या 9 लाख 57 हजार 151 रूपयांच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली. यावेळी सर्व विषयांवर कोणतीही वादग्रस्त चर्चा न करता विरोधकांनी मंजूरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)